किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) हे एक असे मौल्यवान आर्थिक साधन आहे जे शेतकऱ्यांना जास्त व्याज असलेल्या कर्जाची साखळीचक्र मोडून पिकाच्या संपूर्ण मशागत प्रक्रियेदरम्यान - बियाणे खरेदी खर्च ते उत्पादित मालाच्या बाजारपेठ वितरणा खर्चापर्यंत, देखभालपासून गोदामच्या साठवणूक खर्चापर्यंत -स्वस्त कर्ज सहजरित्या प्राप्त करण्यास मदत करते. केसीसी शेतकऱ्यांना विविध कामांसाठी त्वरित रोख रक्कम मिळविण्यात मदत करते आणि त्याच्या परतफेडीमध्ये लवचिकताही प्रदान करते. जेणेकरून शेतकरी आपल्या शेतीशी संबंधित कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो.

कर्जाची वेळेवर परतफेड करण्याचे फायदे

 1. सोयीस्कर बँकिंग, कमी कर्ज दर आणि केसीसीशी संबंधित इतर फायद्यांचा अविरत प्रवेश,जसे की:

  1. कमी रकमेच्या हपत्यात व्यापक असे विमा संरक्षण

  2. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य

 1. आपल्या क्रेडिट स्कोअर मध्ये सुधारणा करते.

  1. आपल्या उत्तम क्रेडिटचे चिन्ह

  2. पुढील वेळी आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक रकमेच्या कर्जरकमेसाठी पात्र बनवते.

  3. आपल्याला भविष्यात कमी व्याजदरासाठी पात्र बनवते.

 1. सरकारकडून अतिरिक्त अनुदान आणि योजनांसाठी आपल्या पात्रतेच्या संधी वाढवते.

केसीसी थकबाकीच्या डिफॉल्टचा प्रभाव

बँकिंग संबंध धोक्यात

केसीसी स्थितीचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाते. अनियमितरित्या पुन्हा कर्जाचा हप्ता भरणे म्हणजे सुविधा खंडित होण्याची शक्यताजास्त.

व्याज शुल्क

कर्ज भरणा डिफॉल्ट होणे हे दंडात्मक व्याज शुल्कास आकर्षित करते जे कर्ज नियमित करण्याच्या वेळी थकीत रकमेवर दरमहा २ %पर्यंत जास्त असू शकते.

क्रेडिट स्कोअर वर नकारात्मक प्रभाव

आपली क्रेडिट हिस्ट्री जर डिफॉल्ट रेकॉर्ड दाखवत असेल तर ते आपला क्रेडिट स्कोअर कमी करते आणि भविष्यात क्रेडिट प्राप्त होण्यास अडचण उद्भवू शकते. कोणतेही कर्ज उपलब्ध असले तर ते सामान्य व्याजदरापेक्षा जास्त दराने असेल.

क्रेडिटमॉनिटर आपल्याला केसीसी चा लाभ सुरू ठेवण्यासाठी नियमित हप्ते भरून वेळेत कर्जपरतफेड करण्याचा सल्ला देतो.